सायबर गुन्ह्या  विषयी  जनजागृती अभियान दि. १६/०/२०१८

  मा. पोलीस अधिक्षक  श्री. रंजन कुमार शर्मा साहेब  यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतना अहमदनगर  पोलीस दलाचे पो .काँ.गणेश पाटील.

1

अहमदनगर जिल्हा पोलीस यांचे विघामाने  परिक्षेत्रिय  उघोजकता   रोजगार मेळावा २०१७ 

दि. 26/11/2017 रोजी सकाळी  11.00 वाजता मा. पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब यांचा मार्गदर्शना खाली  माननीय श्री आण्णा हजारे साहेब, जेष्ठ समाजसेवक यांचे हस्ते  परिक्षेत्रिय पोलीस कर्मचारी पाल्यांसाठी व पारधी समाजातील मुलांसाठी आयोजित  रोजगार मेळाव्याचे उदघाटन न्यु आर्टस्, काॅमर्स अॅण्ड सायन्स काॅलेज, अहमदनगर येथे झाले.यामधे  विविध कंपन्या मधे विविद पदावर  ११२० उमेदवारांची निवड करण्यात आली .दुय्यम निवड फेरीसाठी १४४० उमेदवारांची निवड करण्यात आली .एकूण ३२०० उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला होता.

६६वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा  स्पर्धा २017 रांची झारखंड येथे दिनांक १० ते१४ ऑक्टोबर  पार पडळ्या या स्पर्धा मध्ये बास्केटबाँँल या खैळा मध्ये महाराष्ट्र पोलीस संघाला ४थै क्रमांक  मिळले व या संघा मध्ये अहमदनगर पोलीस दलाचे पो.काँ.२३३५ कपिल गायकवाड यांनी  चांगली कामगिरी केला मुळे यांना  मा. पोलीस अधिक्षक  श्री. रंजन कुमार शर्मा साहेब यांनी अभिनंदन केले.

dae1609e-3c18-4b82-bc82-6c3ca3aec984

दि. 03/11/2017 रोजी सायंकाळी मा. श्री विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारात व्हॉलीबॉल मैदान,  टेनिस मैदान तसेच बॅडमिंटन मैदानाचे उद् घाटन झाले.  त्याचप्रमाणे बालिकाश्रम पोलीस वसाहतीमध्ये जॉगिग ट्रॅक व चिल्ड्रन पार्कचे उद् घाटन करण्यात आले.  सदर प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब,  उप विभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री आनंद भोईटे साहेब, राखीव पोलीस निरीक्षक श्री दशरथ हाटकर,  व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक मा. श्री रंजन कुमार शर्मा यांचा मार्गदर्शना खाली दिनांक 6/11/2017 रोजी 09:00 ते 14:00 वा. शेवगाव शहरात मारुतरावजी घुले पा. मंगल कार्यालय येथे आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवती यांचा नोकरीबाबत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. सदर मेळावाचे वेळी 252 सुशिक्षीत पारधी युवक व 69 युवतींची नोकरी संदर्भाने नाव नोंदणी करण्यात आले. सदर कार्यक्रमास शेवगाव, नेवासा, पाथर्डी, श्रीरामपुर तालुक्यातुन तसेच परभणी जिल्हा बारामती, पुणे जिल्ह्यातुन सुमारे 750 ते 800 पारधी समाजाचे नागरीक हजर होते.

पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे मा.पोलीस अधीक्षक, श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते दि.३१.१०.२०१७ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

एस. पी. रंजनकुमार शर्मा यांची दमदार पावले 

1124

सायबर पोलीस ठाण्यात थेट तक्रारी नोंदविण्यास सुरुवात व इतर पोलीस ठाण्यासही तपासात मदत दि.१५/०८/२०१७

मा. पोलीस अधिक्षक सो यांचे मार्गदर्शनखाली तसेच    मा.Add.SP  पाटील  सर ,मा SDPO भोईटे सर व मंत्रालयीन स्टाफ यांचे सहकार्याने मोटार परिवहन विभाग अहमदनगरला आज रोजी ISO 9001-2015  घोशीत करण्यात आले आहें. अहमदनगर MT  ही महाराष्ट्रातील १ ली व नगर मधीलही १ ली ISO  नामांकन प्राप्त करणारी MT  आहे

01

पोलीस अधीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या कडून दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी  व कर्मचारी यांना मोफत साखर वाटप दि.११.१०.२०१७ 

suger1

Cyber crime training by HDFC Bank on Recent crime trends in E-Commerce/ Net Banking,Identity theft/ Ac takeover. Also aim is to increase Coordination betn Bank official and Police. Date: 19.09.2017

सायबर गुन्हे तपास व  E-Learning कार्यशाळा दि. ०४.०८.२०१७

भिंगार येथे गणेश विसर्जन मिरवणूक सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क चे सदस्यांनी पोलिस मित्र म्हणून मदत केली. यावेळी सहायक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे व सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यानी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.     

गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांचं मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने श्रीरामपूर शहरातून संचालन केले.

मा. श्री रंजन कुमार शर्मा साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील गुणवंत पोलीस पाल्याचा सत्कार केला. त्यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अक्षय शिंदे साहेब, श्री आनंद भोईटे साहेब तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

01

१ मे २०१७ रोजी अहमदनगर पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिन साजरा 

अहमदनगर – १ मे २०१७ रोजी पोलीस परेड कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. प्रा. राम शिंदे  साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी परेड संचालनानंतर पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा तसेच मावळते  पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, महापौर सुरेखाताई कदम तसेच  वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अहमदनगर भेटीचे क्षणचित्रे.

भारताचे राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी यांच्या अहमदनगर भेटीच्या वेळी जिल्ह्याचे पालक मंत्री ना. श्री. राम शिंदे, खासदार श्री. दिलीप गांधी, जि. प.अध्यक्ष श्रीमती. शालिनीताई विखे, जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे, व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी इ. उपस्थित होते.

समन्स वारंट बजावणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारांसह पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. घनश्याम पाटील आदी. दिनांक-06/04/2017

अहमदनगर जिल्हा पोलीस  दलातील खेळाडूंचे अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धे मध्ये घवघवीत यश

०१ ली अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा सन – २०१६ कलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल येथे दिनांक ०३/०१/२०१७ ते ०७/०१/२०१७ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या महिला पोलीस खेळाडू मपोशि/१४३८ कोमल सुरेश शिंदे यांनी तायक्वांदो या क्रीडा प्रकारामध्ये ७३ + कि. ग्रॅ. वजनी गटात कास्य पदक प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी वू -शु या क्रीडा प्रकार मध्ये ७५- कि. ग्रॅ.वजनी गटात कास्य पदक प्राप्त केले.    ६५ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा सन – २०१६ पाटण बिहार येथे दिनांक २७-०१-२०१७ रोजी ते दिनांक ३१-०१-२०१७ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या महिला पोलीस खेळाडू मपोशि/६८२ ज्योती शंकर झुगे यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये ५८  कि. ग्रॅ वजनी गटात कास्य पदक प्राप्त केले आहे. वरील नमूद महिला पोलीस खेळाडू यांनी संपूर्ण भारतीय पोलीस खेळाडू मध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे.

न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे सायबर सुरक्षे बाबत व्याख्यान दि. १२/०१/२०१७

अहमदनगर पोलीस शहर वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांना हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती केली आहे.

मा.ना.प्रा.श्री.राम शिंदे साहेब यांचे हस्ते GPRS सिस्टीमचे उदघाटन व ब्रेथ ॲनालाइझर उपकरणाचे वाटप

दिनांक 09/09/2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अ.नगर येथे मा.ना.प्रा.श्री.राम शिंदे साहेब,मंत्री जलसंधारण व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांचे शुभहस्ते व मा.श्री.अनिल कवडे,जिल्हाधिकारी सो,अ.नगर मा.डॉ.सौरभ त्रिपाठी,पोलीस अधीक्षक, सो. अ.नगर, मा.श्री.घन:शाम पाटील, अपर पोलीस अधीक्षक,अ.नगर सो.मा.श्री.संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर व श्री.मिलींद बुचके,पोलीस निरीक्षक,वायरलेस विभाग अ.नगर यांचे उपस्थित अहमदनगर पोलीस दलातील शहीद पोलीस कॉन्टेबल, दिपक कोलते यांचे कुटुंबीयांना 30,00,000/- रु.किमतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.तसेच अ.नगर पोलीस दलातील 113 वाहनांपैकी 8 वाहनांवर GPRS सिस्टीम बसविण्यात आले.तसेच मद्यप्राशन केल्या बाबतची तपासणी करण्यासाठी अ.नगर जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या ब्रेथ ॲनालयझर उपकरणाचे वाटप करण्यात आले.

1 जुलै वृक्षारोपन दिना निमित्त मा. पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी सो यांच्या मार्गदर्शनानुसार कोतवाली पोलीस स्टेशन, सुपा पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपन दिन साजरा करण्यात आले व वृक्षारोपन करण्यात आले.

* पोलीस मुख्यालय अ.नगर येथे योगा दिन साजरा करण्यात आला *

दि.21.6.2016 हा दिवस जागतीक योगा दिवस म्हणुन साजरा होत असल्याने आज पोलीस मुख्यालय अ.नगर येथे मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री.सौरभ त्रिपाठी सो.यांचेसह व पोलीस उप अधीक्षक श्री.भोईट सो.,परी.उप अधीक्षक श्री.टोम्पे सो. यांनी इतर अधिकारी व कर्मचारी हे योग आभ्यास करतांना…

DSC_0056

मा. पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली.

दि. 29/02/2016 रोजी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली. त्यावेळी पोलीस मुख्यालय अहमदनगर येथे मा. पोलीस अधीक्षक, डॉ. सौरभ त्रिपाठी यांचे नेतृत्वाखाली कवायतीचे संचलन केले. तसेच मा. पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस मुख्यालयातील परिसराची पहाणी केली. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा कामकाजाचा आढावा घेतला.

.

श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे मदत केंद्राचे उद्घाटन

दि. 09/02/2016 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. परि. पोलीस उपअधीक्षक श्री. गजानन टोम्पे, सपोनि श्री. किशोरकुमार परदेशी तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे उपस्थितीत जनतेशी सुसंवाद व समन्वय साधण्यासाठी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन येथे मदत केंद्राचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक यांचे हस्ते करण्यात आले.

.

IMG-20160209-WA0076
IMG-20160209-WA0077

साई पोलीस विश्रामगृहाचे उद्घाटन

दि. 20/01/2016 रोजी शिर्डी येथे साई पोलीस विश्रामगृहाचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विनयकुमार चौबे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा.  सहायक पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, श्री. राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे पोलीस कल्याण निधीतुन राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी शिर्डी येथे साई पोलीस विश्रामगृह बांधण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान -2016

मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे मागदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  शहर वाहतुक शाखा, अ.नगर, जिल्हा वाहतुक शाखा, अ.नगर, शिर्डी वाहतुक शाखा, शिर्डी, उपप्रादेशिक परिवहन विभाग, अ.नगर यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य सुरक्षा अभियान -2016 हे अहमदनगर जिल्ह्यात दि.10/01/2016 ते दि 24/01/2016 या दरम्यान हे राबविण्यात आले.  या अभियाना दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक यांनी वाहनांवर रिफ्लेक्टर व स्टिकर लावले. तसेच वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना सुरक्षित वाहतुक बाबतचे पत्रके वाटली. तसेच विद्यार्थांना सुरक्षित वाहतुक नियमाबाबतचे व वाहतुक चिन्हाबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

शिर्डी येथे शिर्डी वाहतुक शाखेने रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर, लायसन्स‍ वाटप असे उपक्रम राबविले. मा. पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील विविध महाविदयालयात जाऊन महाविद्यालीन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण दिले. तसेच शहरामध्ये वाहतुक जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.  सदर कार्यक्रमाची सांगता रविवार दि.24/01/2016 रोजी करण्यात आली.  यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपअधिक्षक मुख्यालय श्री. आनंद भोईटे, मा. पोलीस उपअधिक्षक नगर शहर विभाग श्री. बजरंग बनसोडे, मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अ.नगर श्री. राजाराम गिते, सहा.पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश पाटील,  सहा.पोलीस निरीक्षक श्री. रणजित गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दि. 26 जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालय अहमदनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री श्री. राम शिंदे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. सदर कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे, मा. पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख तसेच जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व इतर प्रशासकिय अधिकारी उपस्थितीत होते. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडुन संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील विशेष  कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱी यांचा मा. पालकमंत्री यांचे हस्ते मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या खेळाडुंचे घवघवीत यश

28 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा सन 2016 पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे 03 जानेवारी ते 09 जानेवारी या कालावधीत पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षत्र, नाशिक संघाकडुन अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडुंनी सहभाग घेऊन विविध क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करुन घवघवीत यश मिळविले. सदर खेळाडुंचे मा. डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

IMG-20160114-WA0072

कर्जत पोलीस ठाण्याचे नविन इमारतीचे उदघाटन

दि. 01/01/2016 रोजी कर्जत येथे अद्यावत पोलीस ठाणे इमारतीचे उदघाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. राम शिंदे यांचे हस्ते करण्यात कर्जत येथे करण्यात आले.  तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे नविन संकेतस्थळाचे ही उदघाटन करण्यात आले. यावेळी अपर मुख्य सचिव (गृह) मा. श्री. के.पी.बक्षी, विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. जयजीत सिंह, जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल कवडे, पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, अपर  पोलीस अधीक्षक मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक श्री. प्रताप इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात उपस्थित अधिकाऱ्यांच्या नावाने एक झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.

अहमदनगर पोलीस दलातर्फे आज पोलीस मुख्यालय येथे 2 जानेवारी हा पोलीस दल स्थापना दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल कवडे साहेब, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ सौरभ त्रिपाठी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्री. आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक, कोतवाली श्री. मालकर, तोफखाना पोलीस निरीक्षक श्री. मोरे, राखीव पोलीस निरीक्षक लवांदे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी व नागरिकांना पोलीस दलातर्फे शस्त्रासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच नगर शहरात अहमदनगर पोलीस दलातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली.

दि. 02/12/2015 रोजी पोलीस मुख्यालय, अहमदनगर येथे मा. पोलीस अधीक्षक श्री.सौरभ त्रिपाठी व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण श्री. आनंद भोईटे, राखीव पोलीस निरीक्षक श्री लवांदे, पोलीस निरीक्षक श्री. शशिराज पाटोळे, स्थागुशा, सपोनि गलांडे जिवाशा यांच्या विशेष श्रमदानादातुन व सहभागातुन पोलीस कर्मचा-यांच्या योगदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले व पोलीस मुख्यालय येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.

Swachtha Abhiyan in Police Mukhyalay
12341389_444595485749673_3175890521775912905_n
12219399_444595595749662_4290014940951967479_n
12313952_444595499083005_6416555184408799638_n

पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचार यांचेकडून नियमितपणे केले जाणारे श्रमदान….

12108147_431153870427168_6803468058423677397_n
12109166_431154253760463_8571623852055693969_n
12140556_431154060427149_175707607010190606_n
12112093_431153993760489_2441072310780028489_n

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बजरंग बनसोडे यांनी विश्वभारती महाविद्यालय येथे सायबर गुन्हे विषयक कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

12112475_431151177094104_6311469557696701426_n
12118861_431151143760774_6228660171345935761_n

दि. 05/12/2015 रोजी भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुल, अहमदनगर या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या खेळाच्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे मा. डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलीस अधीक्षक, अहमदनगर हे मेळाव्याचे उद्घ्‍ााटन तसेच खेळाडुंना मार्गदर्शन करताना.

12310685_445249205684301_2770705464200258992_n
12359912_445249089017646_841627808210304572_n
12373444_445249095684312_4719926729215688716_n (1)
12075020_445249122350976_6008173518615706521_n