श्रीरामपूर शहर पोलिसांची धडक कारवाई तीन गुन्हयातील सहा आरोपी  अटक व त्या तीन गुन्हयातील ५१,०००/- रु कि. चे एक मोटार सायकल, एक इलेक्ट्रिक मोटार असे मुद्देमाल जप्त दि.२९.१०.२०१७

5b14394b-5564-4473-a138-66329bc5b453

चंदन तस्करी करणारे आरोपी जेरबंद दि.२८-१०-२०१७

3cd8da79-8843-442b-995e-804f37844793

शिर्डी पोस्टे गु र नं 19 /17 भा द वि 392 34 या गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण,  अर्चना आंधरप्रदेश या साईभक्त महिलेला मा. SDPO डाँ सागर पाटील सर , PI इंगळे सर यांच्या हस्ते परत देण्यात आले.

01

स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

मा.पोलीस अधीक्षक सो. डॉ. सौरभ त्रिपाठी, व अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव तसेच अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील सो.  यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा.दिलीप पवार सो. व पोनी लोखंडे सो. श्रीरामपूर शहर  यांना गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीवरून एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोना मनोज गोसावी, रवी कर्डीले, संदीप पवार, प्रमोद जाधव तसेच श्रीरामपूर शहर पोस्टे चे सफौ  भोसले, पोहेका गाडे, गोरे, वेठेकर, गव्हाणे आदींनी सदर इसम नामे पप्पू घिसाडी उर्फ राजेंद्र चव्हाण रा.इंदिरा नगर, शिरसगाव, ता. श्रीरामपूर, अ.नगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडील देशी बनावटीचे २०,४००/- ₹ किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत कडतुस असा मुद्देमाल जप्त करून श्रीरामपूर शहर पोस्टे येथे II गुरन ५२/२०१७  आर्म ऍक्ट ०३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीना मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोस्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.  

WhatsApp Image 2017-04-17 at 11.59.50 AM

मा.अपर पोलीस अधीक्षक सो यांच्या पथकाची कामगिरी 

मा.अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने दोन कोटी किमतीचा सुगंधी गुटखा पकडून त्याच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2017-03-04 at 11.25.50 AM

कोतवाली पोलीस स्टेशन ची कारवाई

कोतवाली पोलीस स्टेशन गुरंन ४२३/२०१६ भादंवि कलम ४५४,३८०,४११ प्रमाणे घरफोडी च्या गुन्ह्यातील दोन आरोपी कडून हस्तगत केलेला मुद्देमाल दोन गॅस टाक्या व १८७००/- रुपये रोख मा. कोर्टाच्या आदेशानुसार फिर्यादी श्री. राजू महादेव क्षीरसागर यांच्या ताब्यात देण्यात आला.

WhatsApp Image 2017-01-29 at 11.48.43 AM (2)

राहाता पोलीस स्टेशनची कारवाई

मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पवार साो. यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन त्यांनी राहाता पोस्टे गुरनं 66/2016 भादवि कलम 307, आर्म ॲक्ट 3/25 मधील आरोपी दिपक अंबादास पोकळे यास लोहारे कासारे शिवारात चापर व एक गावठी कट्टा व दोन राउंड सह सपोनि पवार, सपोनि गलांडे, पोसई दहीफळे, हेकॉ गांगड, चव्हाण, पोना जायभाये, पोकॉ चौगुले अशांनी सापळा रचून रात्री अटक केली. सदर आरोपी विरुध्द यापुर्वी 302,399,394,326,307,224,324 असे गुन्हे दाखल आहेत.

WhatsApp-Image-20160712

श्रीगोंदा पोलीस स्टेशनची कारवाई

दि. 26/12/2015 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. पोनि कडनोर  श्रीगोंदा  पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा  पोस्टे हद्दीत पहाटे 04/00 ते दुपारी 14/00 वा. दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 11 आरोपींना दरोडयाची तयारी करत असतांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळ 2 मोबाईल, कोयता, कटर, कानस, कटावनी, स्क्रुड्रायव्हर, बॅटरी, गज, टॉमी, पक्कड, मोटार सायकल या वस्तु मिळाल्या असून त्यांचे विरुध्द भादवि 399 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहेत.

WhatsApp-Image-20160712 (1)

पुणे व अहमदनगर जिल्हयात ट्रक चालकांना लुटणारी दरोडेखोर टोळी

                               स्थानिक गुन्हे शाखा कडून जेरबंद

मा. पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी सो व मा. अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोस्टेचे सपोनि किशोरकुमार परदेशी सो यांनी प्रसंगावधान राखून कुत्र्याने चावा घेतलेला असताना सुध्दा आरोपींचा पाठलाग करुन दोन दरोडेखोर व संगमनेर येथे लुटलेला 78,00,000/- रु मुद्देमाल असलेला ट्रक 8 तांसात हस्तगत केला होता. उर्वरित दरोडेखोरांना तात्काळ अटक करणे हे पोलीसांसमोर आव्हाण होते. सदर बाबत संगमनेर तालुका पोस्टेला I गुरनं 89/2016 भादवि 395,341 बाबत गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शशिराज पाटोळे सो यांचे पथकातील पोसई सोने सो, पोहेकॉ योगेश गोसावी, पोना संदिप आण्णा पवार, पोना भागीनाथ पंचमुख, पोना उमेश खेडकर, राहुल हुसळे, योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर यांनी सदर गुन्हयाचा 36 तास रात्रंदिवस समांतर तपास करीत देहु गाव पुणे, निगडी परिसर पुणे, सणसवाडी ता शिरुर पुणे नाशिक येथील आरोपींचा मागोवा घेत निगडी येथे सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन संगमनेर येथील गुन्हा करण्याआधी त्यांनी लोणीकंद पोस्टे पुणे ग्रामीण येथे एका व्यक्तीस चाकुचा धाक दाखवुन लुटल्याचे कबुल केले. तसेच त्यांनी शिक्रापुर पोस्टे I 133/2016 भादवि कलम 363,395,341 प्रमाणे व लोणीकंद ट्रक चालकांना परजिल्हयातुन येवुन लुटणा-या टोळीचा माहिती देणारा, मालाची गाडी लुटणारे, मालाची विल्हेवाट लावणारे असे विविध भुमिका सुत्रबध्द पध्दतीने राबवणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

WhatsApp-Image-20160603

31,00,000/- रु.चे किमतीचे 1,125 ग्रॅम सोने फिर्यादीच्या ताब्यात देताना

दि. 24/05/2016 रोजी 20:10 वा. चे सुमारास न्यु चावंडा स्विट जवळ चौकात रोडवर, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे फिर्यादी नामे जगदिश मदन पुरोहित व फिर्यादीचा मित्र केतन धिरज जैन, दोघे रा. मुंबई असे मार्केटिंग करुन हॉटेल वैभव येथे परत जात असतांना अज्ञात 4 आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे अंगावर धावत जाऊन त्यांचे डोळयात मिरचीची पावडर फेकून फिर्यादी यांचे जवळील बॅगमधील 1125 ग्रॅम वजनाचे एकुण 31,00,000/- रु किं चे सोन्याचे दागिणे बळजबरीने हिसकावून चोरुन नेलेवरुन कोतवाली पोस्टे ला गुरनं I 178/2016 भादवि कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ त्रिपाठी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. कोतवाली श्री एस.ई.मालकर सपोनि एस बी पाटील, पोना. उगलमुगले, पोकॉ खाडे यांनी करुन गुन्हयात आरोपी अटक करुन त्यांच्याकडून चोरुन नेलेला मालापैंकी 30,16,000/- रु किं चे सोन्याचे दागिणे व गुन्हयात वापरलेली 4,50,000/- रु किं ची टाटा इंडिका कार जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे

सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल सोन्याचे दागिणे हे मा. न्यायालयाच्या आदेशाने मालक पुष्कतराज सकारिया(मुंबईचे सोन्याचे व्यापारी) रा. मुंबई यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

IMG-20160615-WA0041

अहमदनगर पोलीस शहर वाहतुक शाखेची कारवाई

पोलीस नाईक प्रविण कुसळकर व त्यांचे सहकारी विनोद बोरगे यांनी पहाटे नगरमध्ये सिनेस्टाईल पाठलाग व जोखीम पत्करत आरोपींशी दोन हात करुन हवाला मार्गे चालवलेली सुमारे 97 लाखाची रोख रक्कम जप्त केली. व सदर आरोपींना पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

IMG-20160520-WA0006
IMG-20160520-WA0007

कळस दरोड्यातील आठ जण गजाआड

दिनांक:-15/12/2015 रोजी पहाटे चे सुाा कळस बुाा, ता अकोले येथील रहिवासी श्री. दत्तात्रय रामनाथ वाकचौरे यांचे घरी अनोळखी 7 ते 8 आरोपीनी आमचे गाडीतील पेट्रोल संपले आहे तुमचे गाडीतुन पेट्रोल देता का असे म्हणून दत्ताशेठ व पप्पुशेठ असे नावाने आवाज देवुन दरवाजा उघडायला लावला.  धमकी देऊन बळजबरीने त्यांचेकडून घरातील कपाटाच्या चाव्या घेवुन घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असे एकूण 4,39,500/- रुपयांचा ऐवज चोरुन दरोडा टाकला होता.  त्याबाबत अकोले पोस्टे ला गुरनं 180/2015 भादवि कलम 395, 342 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  सदर गुन्ह्याचा तपास हा अहमदनगर जिल्हा पोलीस दलास एक आव्हान निर्माण झाले होते.

पोलीस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी साो. व अपर पो. अधीक्षक संजय जाधव सो. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अजय देवरे व अकोले पोस्टे पोनि श्री. नारायण वाखारे यांचे  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अकोले पोस्टेचे सपोनि श्री बी.डी.जाधव, पोहेकॉ फटांगरे, पोना खरमाळे पोना राम माळी, पोकॉ साईनाथ राशिनकर , कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मालकर, सपोनि श्री.विनोद चव्हाण, पोकॉ घुंगासे, नितीन उगलमुगले, अहमद इनामदार, पोकॉ, पिलोरे, पोहेकॉ नागरगोजे, स्थागुशाचे पोकॉ दिलीप शिंदे, रविकिरण सोनटक्के यांनी गुन्हा घडले पासून अहोरात्र मेहनत घेवून अवघे 5 दिवसांत  सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील आरोपीचा यशस्वी मार्ग काढून त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1. कदम पोपट चव्हाण, 2.अरविंद सुभाष बर्डे, दोघे रा.भवानीनगर, अहमदनगर 3. बब्बा गोलासिंग टाक, 4.सुनिल जितसिंग जुनी दोघे रा. संजयनगर काटवन खंडोबा, अहमदनगर, 5.संदेश कैलास नन्नवरे रा.मुपो निंबोडी, अहमदनगर, 6.कबीर अब्दुल सलाम खान रा.लोंढे वस्ती, नगर कल्याण रोड, अहमदनगर, 7. गोरख भाऊराव वाकचौरे रा. कळस बुाा, अकोले, 8.विजय गोसावी रा.खांडगांव, ता.संगमनेर असे एकून 8 आरोपीना अटक केली आहे.

गुन्ह्यातील अटक आरोपी यांचेकडून अहमदनगर जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांचेकडे अधिक तपास करीत आहोत.

IMG-20151222-WA0058

गाडया चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या

24 दुचाकी वाहने जप्त

दिनांक:-08/10/2015 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर एमआयडीसी, ब्राम्हणी (ता. नेवासा ) व चिचोंली फाटा (ता. राहुरी ) सर तीन ठिकाणांवरुन चोरटयांना पकडून चोरुन नेलेल्या 24 दुचाकी गाडया हस्तगत केल्या.

पोलीस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी. व अपर पो. अधीक्षक पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना मिळालेल्या माहितीवरुन एमआयडीसी पोस्टे I गुरनं 255/2015 भादवि कलम 379, 34 मधील संशयित तीन इसम चिचोंली परिसरात असल्याची माहिती शाखेच्या पथकाला मिळाली होती.   त्यांचे पथकातील पोलीस उप-निरीक्षक  संदीप शिंदे, सफौ. कृष्णा वाघमारे, पोना हराळ, पोना पंचमुख, पोना बाबा गरड, पोकॉ संदीप पवार, पोकॉ दत्तात्रय हिगंडे यांच्या पथकाने सापळा रचून रमेश शंकर रोकडे, संपत साळवे ( रा. चिचोंली, ता राहुरी ) सुरेश इंगळे (रा. ब्राम्हणी ता. नेवासा) असे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी जिल्ह्यात विविध दुचाकी चोरीची केल्याची कबुली दिली.  त्यांच्याकडून जिल्ह्यात चोरी गेलेल्या एकूण 24 दुचाकी वाहने जप्त्‍ केल्या. त्या गाडयाची किंमत 9 लाख 90 हजार रुपये आहे.   सदर चोरीच्या दूचाकी पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपुर या तालुक्यातील दुचाकी आहेत.

stolen vehicle

पाढंरीपुल येथील सळईचा ट्रक चोरणाऱ्या गुन्ह्यातील  आरोपी जेरबंद

दिनांक :- 05/01/2016 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे साो. यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांची त्यांचे पथकातील पोसई संजयकुमार सोनी, पोहेकॉ मन्सुन सय्यद, योगेश गोसावी, पोना उमेश खेडकर, राहुल हुसळे, पोकॉ.जितु गायकवाड, योगेश सातपुते, रवि सोनटक्के, दिपक शिंदे यांच्या पथकाने पांढरीपुल  येथून सळईचा ट्रक चोरुन घेऊन जाणारे आरोपी हे शेवगाव परिसरातील असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे शेवगाव परिसरातुन 2 व मंठा ता.जालना परिसरातुन 1, बिड शहरातुन 1 अशा  सळईचा ट्रक चोरणाऱ्या 4 आरोपींना सापळा रचून पकडले.  सदर आरोपी हे सोनई पोस्टे I गुरनं 204/2015 भादवि कलम 392 मध्ये निष्पन्न्‍ झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली एक आयशर टेम्पो किं.अं.4,00,000/- व 11 टन लोखंडी सळई किं.अं.3,00,000/- किं.चा असा एकून 7,00,000/-किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रस्ता लुटीतील तीन आरोपी जेरबंद

दि. 06/01/2016 रोजी नगर जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी शिवारात वाहन चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना नगर तालुका व भिगांर  पोलीसांच्या संयुक्त पथकाने तिघांनाही सावेडी उपनगरातून ताब्यात घेतले.

रमेश बाळू वाघमारे (रा. सातपुर नाशिक) हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिकवरुन आंध्रप्रदेश चालले होते. टाकळीकाझी शिवारातील टोलनाक्याजवळ ती कार दोन जणांनी अडविली. पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत असलेल्या साहित्यासह मारुती कार घेऊन पसार झाले.

 मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका व भिगांर  पोलीसांच्या संयुक्त पथकाने तिघांनाही सावेडी उपनगरातून या गुन्ह्यातील आरोपी 1. प्रताप सुरेश गडाख 2. दत्ता बबन काळे 3. शहाजी डेमरे (सर्व रा.पाईपलाईन रस्ता, सावेडी,नगर ) या तिघांना ताब्यात घेतले. तसेच चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.  गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

मोटार सायकल चोर जेरबंद

दि.17/01/2016 रोजी मा. पोलिस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शशिराज पाटोळे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी त्यांचे पथकातील पोसई हिगोंले, पोना संदीप पवार, भागिनाथ पंचमुख, प्रविण जगताप, पोकॉ अशोक गुंजाळ, संदीप पवार, प्रमोद जाधव, विशाल दळवी, सूरज वाबळे, चापोकॉ सचिन कोळेकर यांनी रासने नगर येथील मोटार सायकल चोरीतील संशयित इसम बबल्या उर्फ सुनील  आजबे यास टचोरीच्या मोटार सायकल सह ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सखोल चौकशी करता  त्याच्याकडून आणखी 10 मोटार सायकली असा एकूण 3,09,000/- चा मुद्देमाल हस्त्गत करुन सदर आरोपी व मुद्देमाल यास कलम राहुरी पोस्टे I  गुरनं 18/2016 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल असून सदर आरोपीस राहुरी पोस्टे येथे जमा करण्यात आले आहे.

IMG-20160118-WA0040

भारत ऑस्ट्रोलीया क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटींग) चालवणारे जेरबंद

दि. 20/01/2016 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना गोपनिय माहिती मिळाली की, नगर शहरात गुलमोहर रोडवरील कस्तुरी निवास नाव असलेल्या घरामध्ये मोहन जोशी नावाचा इसम हा सध्या चालु असलेल्या भारत ऑस्टोलीया क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोसई संदीप शिंदे, पोहेकॉ योगेश गोसावी, सुनिल गायकवाड, पोना दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, पोना जितेंद्र गायकवाड, रावसाहेब हुसळे, उमेश खेडकर, सुरज वाबळे,  रोहीत मिसाळ, मपोकॉ मनिषा पुरी, प्रियंका चेमटे, दिपाली घोडके यांचे पथकाने गुलमोहर रोड येथे जावून सदर घरावर छापा टाकला असता 1) मोहन मदुरादत्त जोशी वय 40 रा.कस्तुरी निवास, गुलमोहर रोड, अहमदनगर 2) अशोक भाऊसाहेब गर्जे वय 31 रा.कायनेटीक चौक, अहमदनगर हे दोघे दुरदर्शन संच व एक लॅपटॉप घेवून मोबाईल फोनवर सट्टा लावत असल्याचे मिळून आले त्यांचे कब्जात 12,10,120/- रु.रोख व 11 मोबाईल, 1 दुरदर्शन संच, 1 लॅपटॉप अशा एकूण 12,95,820/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुध्द पोना सुरज वाबळे यांनी फिर्याद दिल्याने तोफखाना पोस्टेला II गुरनं 10/2016 मुं.जू.कायदा कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई संदीप शिंदे हे करीत आहेत.

IMG-20160121-WA0025

रस्ता लुट करणारे गजाआड

दि. 02/02/2016 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोनि शशिराज पाटोळे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोसई संदिप शिंदे, पोहेकॉ मन्सुर सय्यद, योगेश गोसावी, पोना उमेश खेडकर, राहुल हुसळे, पोकॉ जितेन्द्र गायकवाड, संदिप पवार, योगेश सातपुते, दीपक शिंदे, रवि सोनटक्के, चालक कोळेकर यांनी नगर तालुका पो स्टे गुरनं 05/2016 भादवि कलम 392,34 मधील रोडवर लुटमार करणारे 3 आरोपी यांची गोपनीय माहिती काढून त्यांना गुन्हयात लुटलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींना पुढील तपासकामी नगर तालुका पो स्टे गुरनं 05/2016 भादवि कलम 392,34 मध्ये जेरबंद केले.

या कारवाईमुळे रोडवर लुटमार करणारी नविन टोळी उघडकीस आणली आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

nagar taluka rasta lut

वाहने लुटणारी आणखी एक टोळी गजाआड

दि. 04/02/2016 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी, अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि शशिराज पाटोळे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे तपास पथकातील पोसई संदिप शिंदे, राजकुमार हिंगोले, पोना दत्तात्रय हिंगडे, भागिनाथ पंचमुख, पोकॉ रवि सोनटक्के, दिपक शिंदे, संदिप पवार, विशाल दळवी, प्रमोद जाधव, चापोहेकॉ भोपळे, सचिन कोळेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन देहेरे गावचे शिवारात सापळा रचुन ईश्वर शिंदे रा. देहेरे ता. नगर व योगेश खरात रा. कोपरगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी नगर तालुका व एमआयडीसी पोस्टे हद्दीत वाहनांना अडवुन रस्तालुट केल्याचे कबुल केले. अधिक तपास करता त्यांचेकडुन सन 2015 मध्ये केलेल्या लुटीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी त्यांना नगर तालुका पोस्टेच्या ताब्यात देण्यात आले.

रस्तालुटीच्या गुन्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थी

Rahuri

चोरीच्या गाडया हस्तगत करणारे कॉन्स्टेबल दळवी व लोंढे यांचा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार

पत्रकार सागर शिंदे यांची दोन दिवसापुर्वी एम.एच.17 एक्स 616 या क्रंमाकाची दुचाकी वाडीयापार्क येथून चोरीस गेली असता मा. पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली होती. या दरम्यान जिल्हाभरातील सर्व पोलीस कर्मचारी यांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली असता व शोध घेत असता पत्रकार शिंदे यांची गाडी भिंगार पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल परशुराम दळवी व जालींदर लोंढे यांनी मिळून देवून मोलाची भुमिका बजावली.  पत्रकार शिंदे यांच्या गाडीच्या शोधा दरम्यान चोरीच्या अनेक गाडया हस्तगत झाल्या. त्यामुळे अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यासमवेत मा. पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, मा. अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. शशिराज पाटोळे व कोतवाली पोलीस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण यांचेसह पोलीस दलाचे आभार मानन्यात आले.  

IMG-20160321-WA0020

पतसंस्थेच्या लुटीतील 12 लाख रुपयांची रोकड हस्तगत

IMG-20160322-WA0005

शोरुम मधील शिपायानेच चोरलेल्या दोन गाडया हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

IMG-20160317-WA0016