दि. ०२-०३-२०१७ रोजी शिर्डीत ऑपरेशन मुस्कान कारवाई
स.पो.नि. बेहरानी यांच्या पथकाची कारवाई : १३ विधी संघर्षित बालके घेतली ताब्यात

Operation Muskan 02-03-2017

ऑपरेशन मुस्कान योजना 2016

अहमदनगर जिल्हयात ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ॥ शोध मोहिम अंतर्गत रेल्वे स्टेशन, बस स्थानक, हॉटेल, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी अल्पवयीन बालके काम करताना मिळुन आले सदर बालकांची घरची आर्थिक परिस्थिती दुर्बल व कमकुवत असल्याने मुले स्वत:हुन घरातून बाहेर पडून काम करत होती त्यांना कोणीही सक्ती करत नव्हते अशा बालकांना रेकार्ड व्यतिरिक्त 18 मुले व 1 मुलगी हरवलेली बालके समजुन सदर बालकांची प्राथमिक चौकशी करुन त्यांचे आई वडीलांचा/ नातेवाईकाचा शोध घेतला.

बालकांचे आईवडील/ नातेवाईक यांनी बालकांस यापुढे काम करु देणार नाही तसेच त्यांचे  पालनपोषन, काळजी व संरक्षणाची जबाबदारी व्यवस्थितरित्या सांभाळ करु आणि त्यांचे शालेय शिक्षणाकडे लक्ष देवु अशी हमी दिल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अल्पवयीन 15 मुले व 1 मुलगी हे  त्यांचे पालकांचे ताब्यात दिले व 3 मुले हे बालकल्याण समिती, अहमदनगर यांचे समोर हजर करुन त्यांना त्यांचे आदेशाने पालकांचा शोध लागे पर्यंत तात्पुरता बालगृहात निवारा देवुन वरील बालकांचे पुर्नवसन केले. हे सामाजिक काम करताना बालके ताब्यात मिळाल्याचे त्या  मुला व मुलीच्या पालकांच्या चेह-यावरील हसु व आनंदाश्रू पाहून पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सपोनि अनिल बेहेरानी, सफौ बी. डी. मरकड, सफौ व्ही. डी. भारती, पोहेकॉ 369 डोईफोडे, पोना 982 बी. एम. इखे, मपोशि 1632 घुटे यांना पोलीस खात्यात राहुन सामाजिक काम केल्याचे समाधान लाभले.

अहमदनगर जिल्हयात “ऑपरेशन मुस्कान” या शोधमोहिमेच्या अनुशंगाने दिनांक 01.07.2015 ते 31.07.2015 रोजी दरम्यान अभियान राबविण्यात आले असुन सदर शोधमोहिमेत दिनांक 16/07/2015 रोजी अहमदनगर शहरात गौरी घुमट, पटवर्धन चौकात मध्यप्रदेश राज्यातील 4 बालके जिल्हा संरक्षण कक्ष, अहमदनगर येथील अधिकारी/ कर्मचारी यांना रस्त्यावर फिरताना मिळुन आली आसता त्यांनी Ahtu कक्ष अ.नगर यांना संपर्क साधला असता सदरची बालके अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवर चेक केली आसता ती रेकॉर्डवर नव्हती.

त्यामुळे संयुक्तीक कारवाई करुन सदर बालकांकडे प्राथमिक चौकशी करुन त्यांचे पालकांचा शोध घेतला आसता पालकांची आर्थिक स्थिती दुर्बल असल्याने उपजिवेकेसाठी बाहेरगावी भटकंती करत नगर शहरात आली होती. व पाल टाकुन शहराच्या उपनगरात राहत होती. तरी सदर बालकांनी स्वत:च्या पालकांना ओळखले व पालकांनी देखील सदरची बालके आमचीच असुन ती सकाळी त्यांनी टाकलेल्या पालातुन कोणालाही काही एक न सांगता स्वत:हुन शहरात फिरण्यास आली होती अशी खात्री पटल्याने त्यांचे तसे जबाब घेवुन व कागदपत्रे घेवुन जिल्हा बाल संरक्षक अधिकारी, अहमदनगर यांचे उपस्थितीत सदरची बालके त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात आली.

बालकांची नांवे– 1) मनिष बलदेव राजनट वय-12 वर्षे, 2) राजकपुर आझाद राजनट वय- 6 वर्षे,

3) राजासिंग श्यामलाल राजनट वय- 14 वर्षे, 4) बादल श्यामलाल राजनट वय- 9 वर्षे,

सोबत- बालकांची फोटो व फॉर्म जोडलेले आहेत.

missing child

दि. 26/04/2016 रोजी ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र शोध मोहिम अंर्तगत शनिशिंगणापुर देवस्थान ता. नेवासा जि. अहमदनगर या ठिकाणी शोध घेवुन दोन मुलींना त्यांचे नाव 1. मंगल साहेबराव फुलमाळी वय 10 वर्ष 2. मनिषा साहेबराव फुळमाळी वय 6 वर्ष असे त्यांचे पालकांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले.

IMG_0633

दि. 24/04/2016 रोजी ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र शोध मोहिम अंर्तगत कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्यीत माळीवाडा बसस्टॅण्ड परिसारात बेवारस फिरणारे बालक नामे राजु काळु साळवे वय 10 यास त्याचे पालकाचा शोध घेवुन त्यांच्या सुखरुप ताब्यात देण्यात आले.

IMG_0590