स्थानिक गुन्हे शाखेकडून 10 वर्षापासून फरार असलेला आरोपी  जेरबंद

New Microsoft Office Word Document (2)-page-001

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जबरी चोरी व घरफोडी व गुन्हयामधील आरोपी जेरबंद दि २८-१०-२०१७

New Microsoft Office Word Document-page-001 (2)

गुन्हेगारांना नाशिकमध्ये फ्लॅट मिळवून देणाऱ्याला अटक

7a0bd876-0ec0-4848-9c90-789c0e64d5ed

स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांची नाशिक शहरामध्ये धडक कार्यवाही मोक्का केस मधले फरार आरोपी त्याचे साथीदारासह दोन गावठी कट्टे व ४० जिवंत काडतुसांसह अटक दि. २२-१०-२०१७

7c88bdb2-7826-4dd5-bdef-6e248cdc0360

स्थानिक गुन्हे शाखेकडून श्रीरामपूरचे अट्टल सराईत गुन्हेगार जेरबंद दि.१३/१०/२०१७

01

💥 अपहरण तसेच POCSO गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद 💥दिनांक 19/09/2017 रोजी
मा. पोलीस अधीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा सो. यांना मिळालेल्या गुप्तबातमीदाराच्या माहितीवरून तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. घनश्याम पाटिल सो. यांच्या सुचनेप्रमाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोहेकाॅ. दत्ता हिंगडे पोहकॉ भोपळे, पोना सुनिल चव्हाण, रविकिरण सोनटक्के, राहुल हुसले, संदिप (आण्णा) पवार, योगेश सातपुते यांनी केडगाव परिसरात तपास केला असता आरोपी नामे श्रीपती उर्फ दादा विठ्ठल घोडके, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा यास सापळा रचून धरला.
सदर आरोपीवर सन 2014 ला श्रीगोंदा पोस्टे ला l गुरनं. 175/2014 भादंवि कलम 363, 366 तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 अंतर्गत कलमान्वये गुन्हा दाखल होता.

01

शिर्डी मध्ये तरुणाचा खून करणारे आरोपी शिर्डी पोलिसांकडून अल्पावधीत जेरबंद दि.०३.०९.२०१७

दरोडा व जबरी चोरीतील निष्पन्न फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दि.३१.०८.२०१७

02

कर्जत मधील पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दि. २४.०८.२०१७

02

श्रीगोंदा शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीतील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद Date-21/08/2017

01

दि.१५/०६/२०१७ रोजी अहमदनगर शहरात घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद 

02

दिनांक ०२/०४/२०१७
मा.पोलीस अधीक्षक सो. डॉ. सौरभ त्रिपाठी,अप्पर पोलीस अधीक्षक सो. घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा.दिलीप पवार सो. यांना गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीवरून त्यांचे पथकातील पोहेकॉ. विष्णू घोडेचोर, सुनील गायकवाड, बाबा गरड, संदीप पवार ,मनोज गोसावी, प्रमोद जाधव व चापोना देविदास काळे, भोपळे आदींनी डिग्रस, ता. राहुरी येथील मुळा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करीत असलेले आरोपी नामे
१.मुजाफर शेख,रा. बारगाव नांदूर
२.बाबासाहेब गागरे, रा.देसवंडी
३.अप्पासाहेब शिरसाठ, बाभूळगाव यांना ताब्यात घेऊन २ ढंपर,१ ट्रॅक्टर व २ मोटारसायकल असा एकूण २६,००,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून राहुरी पोस्टे येथे I गुरन १११/२०१७ भादवी ३७९,३४ अन्वये वाळूचोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीना मुद्देमालासह राहुरी पोस्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

खंडणी  करीता अपहरण करून निर्घृण खून करणारे आरोपी पाच तासात अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दि. २८/०२/२०१७

Document-page-001

निघोज गावातील गोळीबार व कोयत्याने हल्ला करून खुनाचा  गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह 5 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखेची कारवाई

दिनांक 21/1/2017 रोजी भरदुपारी निघोज गावात पूर्व वैमानस्यातून गावातील माजी सरपंच  संदीप वारळ याचा कोयत्याने व गोळीबार करून खून करण्यात आला होता. उपलब्ध cctv व साक्षीदार याचे आधारावर मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ त्रिपाठी व अपर पोलीस अधीक्षक श्री घनश्याम पाटील, उप विभा. पो. अधिकारी श्री आंनद भोईटे  यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे  यांना मिळालेल्या माहिती वरून यांच्या नेतृत्वाखालील सपोनि शरद गोर्डे , पोसई राजकुमार हिंगोले व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचे पथकाने दि 26/1/2017 रोजी पेण जि. रायगड येथून सदर गुन्हयातील आरोपी नागेश तुळशीराम लोखंडे रा. लोणी धामणी ता. आंबेगाव यास सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल तपास करता त्याने खुनाचा मुख्य आरोपी त्याचे इतर साथीदार हे उस्मानाबाद  परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून वरील पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपीची माहिती काढून अत्यंत संयमाने दि 28/1/2017 रोजी पहाटेचा वेळी बेंबली ता. उस्मानाबाद गावात निर्जन ठिकाणी असलेल्या आरोपीवर सापळा लावून छापा टाकून गुन्ह्यातील कोयत्याने हल्ला करणारा मुख्य आरोपी 1. विकी उर्फ विकास आनंदा रसाळ  व  2. राहुल रामदास साबळे  दोन्ही रा. निघोज  ता. पारनेर 3. अक्षय झुंबर लुडे रा. गाडीलगाव ता. पारनेर 4. ऋषिकेश सुभाष भोसले 5. प्रसाद बाबुराव गिरी दोन्ही रा. उस्मानाबाद याना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे , स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत. सदर गुन्ह्यात आणखीन काही आरोपी लवकर अटक होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Image 2017-02-06 at 4.50.21 PM
IMG-20160622-WA0008

अट्टल दरोडेखोर जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20_6_16

अट्टल दरोडेखोर जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मा. पोलिस अधीक्षक डॉ.श्री.सौरभ त्रिपाठी सो व मा.अपर पोलिस अधीक्षक श्री.पंकज देशमुख सो यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.शशिराज पाटोळे सो यांना मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे त्यांच्या पथकतील पोसई राजकुमार हिंगोले सो पोहेकॉ दादासाहेब काकड़े पोकॉ दिगंबर कारखेले पोकॉ मल्लिकार्जुन बनकर,पोकॉ नामदेव जाधव यांनी बेलवंडी पो.स्टे हद्दीत सापला रचुन इसम नामे गोप्या ऊर्फ गोपीनाथ कलसिंग भोसले वय-29 रा-खरतवाड़ी ता-श्रीगोंदा जि-अहमदनगर यास ताब्यात घेऊन चौकशी करता सदर आरोपी हा खालील गुह्यात फरारी पाहिजे असून ते गुन्हे खालील प्रमाणे.

पोलीस स्टेशन     गुरनं. व कलम

कोतवाली पो.स्टे  I 378/2015 IPC 394,397

I 407/2015 IPC 457,380

I 349/2015 IPC 457,380

पारनेर पो.स्टे       I 431/2015 IPC 457,380

I 290/2015 IPC 457,380

I 279/2015 IPC 457,380

I 256/2015 IPC 457,380,511

I 416/2015IPC 457,380

I 8/2016 IPC 457,380

I 9/2016 IPC 457,380

I 11/2016 IPC 457,380

I 32/2016 IPC 457,380

I 43/2016 IPC 457,380

नगर तालुका पो.स्टे          I 121/2014IPC 457,380

| 190/2015 IPC 457,380,511

बेलवंडी पो.स्टे     I 8/2016 IPC 457,380

I 9/2016 IPC 379

I 10/2016 IPC 379

I 150/2015 IPC 376,34

श्रीगोंदा पो.स्टे     I 39/2008 IPC 395,420

सुपा पो.स्टे          I 49/2015 IPC 399 आर्म Act 4/25

आळेफाटा पो.स्टे I 6/2016 IPC 457,380

असे एकुण 22 गुन्हे सदर अरोपीवर दाखल आहेत.
तसेच कोतवाली पो.स्टे गु.रजि न.I 130/2016 IPC 394,34 या गुह्यतील संशयित म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास कोतवाली पो.स्टे करत आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी  मुद्देमालासह जेरबंद

दि. 04/03/2016 रोजी मा. पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांचे पथकातील पोसई संजयकुमार सोने, पोहेकॉ मन्सुर सय्यद, योगेश गोसावी, पोना उमेश खेडकर, राहुल हुसळे, दत्ता हिंगडे, भागिनाथ पंचमुख, पोकॉ जितु गायकवाड, सुरज वाबळे असे दरोडा प्रतिबंधक गस्त करीत असताना रात्री 01:00 वा.चे सुमारास बातमी मिळाली की, नगर मनमाड बायपास रोडवर निंबळक चौफुलीच्या पुढे पेट्रोल पंपासमोर काही इसम रस्तालुट करण्याच्या इराद्याने थांबले आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन छापा टाकला असता आरोपी 1. अजय वाघमारे 2. अनिल कांबळे यांना पाठलाग करुन पकडले. त्यांचेकडुन दरोड्यासाठी वापरण्याचे हत्यारे व एक मोटारसायकल हस्तगत केली. त्यांचेविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला I  गुरनं. 42/2016 भादवि कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मंगळसुत्र चोर 8 तासाच्या आत मुद्देमालासह जेरबंद

दि. 03/03/2016 रोजी सकाळी 11 वा.चे सुमारास ऑक्झिलीयम शाळेजवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटारसायकलवरील चोराने ओढुन चोरुन नेलेबाबत तोफखाना पोस्टेला I गुरनं. 68/2016 भादवि कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी त्यांचे पथकातील पोसई संजयकुमार सोने, पोहेकॉ सुनिल गायकवाड, योगेश गोसावी, पोना उमेश खेडकर, राहुल हुसळे, दत्ता हिंगडे, संदिप पवार, भागिनाथ पंचमुख, बाबा गरड, पोकॉ जितु गायकवाड, शैलेश गोमसाळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, देवा काळे यांना कळविलेवरुन त्यांनी लेखानगर अहमदनगर येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा रचुन आरोपी नामे हनुमंत येल्लु शिंदे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेले 30,000/- रुपये किंमतीचे मंगळसुत्र हस्तगत केले.

मुलाचे अपहरण करुन 2 कोटी रुपयांची खंडणी मागणारे आरोपी अवघ्या 12 तासात अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोनई ता. नेवासा येथील पंचायत समिती सदस्य श्री. राजेंद्र गुगळे यांचा मुलगा सार्थक वय 9 वर्षे यास दि. 24/02/2016 रोजी काही अज्ञात इसमांनी अपहरण करुन श्री. राजेंद्र गुगळे यांना फोन करुन 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. तसेच पोलीसांना सांगितले तर तुमच्या मुलास ठार मारु अशी धमकी दिली.

अपहरण झालेल्या मुलाच्या नातेवाईकांनी सुरुवातीस पोलीसांना माहिती देण्याचे टाळाटाळ केली, परंतू त्यांना विश्वासात घेवुन सोनई पोस्टे I गुरनं. 22/2016 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करुन मा. पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वेगाने स्थागुशाचे तपास पथक तयार केले. गुन्ह्यातील काही आरोपी पुणे रेल्वे स्टेशन येथे पार्किगचे आवारात अपहरण केलेल्या मुलाला सोडविण्यासाठी मागितलेली खंडणीची रक्कम घेण्यासाठी येणार असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने तसेच पोलीस कर्मचारी मन्सुर सय्यद, सुनिल गायकवाड, रविकिरण सोनटक्के, मल्लीकार्जुन बनकर, प्रमोद जाधव, दिगंबर कारखेले, जितेंद्र गायकवाड, शैलेश गोमसाळे, किरण जाधव, रोहित मिसाळ, संतोष गोमसाळे, विनोद मासाळकर, देविदास काळे यांनी पुणे रेल्वे स्टेशन पार्किगचे आवारात सापळा रचुन मिळालेल्या गोपनीय बातमीतील वर्णनाप्रमाणे संशयास्पद हालचाल करणारे दोन इसम दिसुन आले. आरोपी 1. गणेश दत्तात्रय वरघुडे वय 26 रा. कांगुणे रोड, सोनई ता. नेवासा 2. तान्हाजी पांडुरंग कुसळकर वय 36 रा. बालाजी मंदिराजवळ वडारवाडा सोनई ता. नेवासा यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व अपहरण केलेल्या मुलास सोनई परिसरात कांगुणी येथे ठेवले असल्याचे सांगितल्याने सोनई पोस्टेचे सपोनि सानप व पोकॉ संदिप घोडके व इतर यांनी अपहरण झालेलया मुलास आरोपीने सांगितलेल्या ठिकाणाहुन आरोपी नामे बबन लष्करे रा. सोनई ता. नेवासा याचे ताब्यातुन सुखरुप सुटका करुन आरोपीस ताब्यात घेतले. 

अपहरण प्रकरणाचा तपास काही तासातच लावल्याबद्दल मा. पालकमंत्री प्रा.श्री. राम शिंदे यांनी तसेच मा. जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे, मा. पोलीस अधीक्षक डॉ.श्री. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे तपास पथक त्याचप्रमाणे सोनई पोस्टेचे सपोनि सचिन सानप व त्यांचे पथकाचे अभिनंदन केले.

IMG-20160226-WA0035
IMG-20160226-WA0033
IMG-20160227-WA0077

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

पाच जणांना अटक , दोन बनावट पिस्तूल हस्तगत

दि. 15/02/2016 रोजी पहाटेच्या सुमारास विळदघाट येथे दरोड्याच्या तयारीतील पाच जणांची टोळी एमआयडीसी पोलीसांनी पकडली. मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल पवार, पोसई नागवे तसेच पोस्टेचे कर्मचारी विळदघाट येथे रात्रीची गस्त घालत असताना विळदघाट येथे पाच संशियीत इसम पोलीसांना दिसले. त्यांच्या संशायास्पद हालचाली आढळुन आल्याने त्यांना सापळा रचुन शिताफिने पकडले. त्याचंकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव 1. सागर आण्णसाहेब भांड 2. गौतम आण्णासाहेब वर्पे 3. आण्णासाहेब अनंता दातीर 4. किरण रावसाहेब जरे 5. (अल्पवयीन) असे सांगितले. तसेच त्यांनी काही गुन्ह्यांची कबुलीही दिली. त्यांचेकडुन दोन बनावट पिस्तूल, तीन मोटार सायकली, मिरचीपूड, दोन चाकु, लोखंडी फायटर असा मुद्देमाल हस्तगत केला.

MIDC 399

दोन जिल्ह्यातील वॉन्टेड दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: दरोडा / जबरी चोरी / घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांची टोळी उघड

अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफोडी या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगारी टोळीतील आरोपी दत्तात्रय आर्या भोसले रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा यास स्थानिक गुन्हे शाखेने सापाळा रचुन जेरबंद केले आहे. त्याने कोतवाली, पारनेर, बेलवंडी, नगर तालुका, आळेफाटा, चाकण, पोलीस ठाण्याच्या हद्दित गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दरोडे, जबरी चोरी, घरफोड्या इ. गुन्ह्यातील सराईत असलेला दत्तात्रय आर्या भोसले हा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे असल्याची माहिती स्थागुशाचे पोनि शशिराज पाटोळे यांना समजली होती. त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक, श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि शशिराज पाटोळे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे त्यांचे पथकातील पोसई राजकुमार हिंगोले, पोहेकॉ मधुकर शिंदे, पोना बाबासाहेब गरड, पोकॉ कारखेले, बनकर, अमृते, नामदेव जाधव, चोपोकॉ सचिन कोळेकर आदिंच्या पथकाने सुरेगाव शिवारातील डोंगर परिसरात सापळा रचला. तो एका झाडाखाली लपुन बसलेला असता त्यास पकडले. त्याचेकडे अधिक चौकशी केली त्याने अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यात अनेक गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.

मुलानेच दिली बापाची सुपारी

दरोडा प्रकरणाला कलाटणी : दोघांना कोठडी

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे १७ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला होता. या दरोड्यात उमाजी मतकर (वय ६५) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत मतकर हे जागीच मयत झाले, तर घरातून ४0 हजार रुपयांची रोकड चोरीस गेली होती. या दरोड्याचा तपास करताना श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी गुन्ह्याची उकल करीत मयत उमाजी मतकर यांचा मुलगा संतराम मतकर याला मंगळवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. संतराम याने मावस मेव्हणा संदीप मोहन शेंडगे याच्या मदतीनेच दरोड्याच्या बहाण्याने उमाजी यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संतराम याच्या मुलीच्या लग्नासाठी उमाजी हे पैसे देत नसल्याचे संतराम याने ही दरोड्याची योजना आखल्याची कबुली दिली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

SHRIGONDA

कुख्यात दरोडेखोर रवि भोसले अटकेत

शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर हत्येतील म्होरक्या रवि चलास भोसले ( रा.गणेगाव ता शिरुर ) यास नगर पोलीसांनी बुधवारी दि.25/11/2015 रोजी सकाळी राहत्या घरुन अटक केली.  नगर जिल्ह्यातील  डझनभर गुन्ह्यासह पुणे, सोलापूर पोलीसांसाठीही तो ‘ वॉन्टेड’ होता.  त्याच्याविरुध्द यापूर्वीच मोक्का अन्वये कारवाई करण्यात  आलेली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी व अपर पो. अधीक्षक पंकज देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना मिळालेल्या माहितीवरुन यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, संजयकुमार सोने, पोकॉ दिगंबर कारखिले, पोकॉ बनकर, पोकॉ विनोद मासाळकर, पोकॉ मच्छिंद्र बर्डे, पोकॉ सुरज वाबळे, पोहेकॉ मन्सुर सय्य्द, पोना योगेश गोसावी पोना उमेश खेडकर आदीचे पथकाने गणेगाव शिवारात सापळा रचला. रवि भोसले त्याच्या घरात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकाने त्याच्या घरात झडप घालून रविला उचलून पोलीसांच्या जीपमध्ये कोंबले.  तेथील रहिवाशांनी पोलीसांना प्रतिकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

12313551_444849122390976_4888544158806519989_n

कुख्यात दरोडेखोर संतोष वायकर जेरबंद

नगरसह औरगांबाद , पुणे, नाशिक पोलीसांनाही होता वॉन्टेड

नगरसह औरगांबाद, पुणे, नाशिक पोलीसांसाठी वॉन्टेड असलेला कुख्यात गुंड आणि दरोडेखोर संतोष सुखदेव वायकर (रा. वाळकी, ता.कोपरगाव) त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोऱ्या, खुनाचा प्रयत्न्‍ असे तब्ब्ल 43 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध औरंगाबाद पोलीसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यान्वयेतयार केलेला प्रस्ताव मंजुर झालेला असून ता फरार होता. नगरमध्येही त्याच्याविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. संतोष वायकर व त्याच्या दोन साथीदारास (दि.11) रोजी सकाळी 07:00 वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा रचून जेरबंद केले.

पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी साो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, लोणीचे सपोनि नितीन पगार, उपनिरीक्षक सुधीर पाटील, भालचंद्र शिंदे, सफौ संदीप कहाळे, पोलीस कर्मचारी इरफान शेख, शरद वांढेकर, विशाल दळवी, बाळासाहेब काळपे, किरण शेलार, शरद आहिरे आदीचे पथकाने संतोष वायकर याच्या दोन साथीदारासह खिर्डीगणेश गावात येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने संतोष वायकर ज्या घरात येणार होता.  तेथेच पोलीस दबा धरुन बसले तो तिथे येताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून संतोष वायकर व त्याच्या दोन साथीदारासी ताब्यात घेतले.  त्याच्याकडून गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, दोन मोबाईल हॅण्डसेट, दोन दुचाकी वाहने हस्तगत केली.

SANTOSH VAYKAR 1

दरोडयातील आरोपी जेरबंद

मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. शशिराज पाटोळे साो पोलीस निरिक्षक स्थागुशा यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांचे पथकातील पोलीस उपनिरिक्षक राजकुमार हिंगोले, पोकॉ दिंगबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने यांनी सोनई पोस्टे हद्दीतील पानसवाडी ता. नेवासा येथील दरोडयाचे गुन्हयातील फरार आरोपी नामे गौतम हिरामण काळे रा. पानसवाडी ता. नेवासा हा त्यांचे राहते घरी आला असल्याचे बातमी मिळाल्याने मा. पोलीस निरिक्षक शशिराज पाटोळे साो यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोसई हिंगोले व त्यांचे पथकातील वरील नमुद कर्मचारी यांनी आरोपीत मजकुर याचे राहत्या घरी सापळा लावला असता तो शेतात ऊसात पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन मोठया शिताफिने ताब्यात घेतले व त्यास पुढील योग्य त्या कारवाईकरिता सोनई पोस्टे च्या ताब्यात देण्यात आले आहेत.  सदर आरोपी विरुद्ध सोनई पोस्टेला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.क्र. पो.स्टे. गुरनं कलम
1 सोनई I 104/1996 भादवि 353,341,333,504,506,34
2 सोनई I 113/1997 भादवि 324,323,34.
3 सोनई I 05/1999 भादवि 457,395,396
4 सोनई I 46/1999 भादवि 394,457
5 सोनई I 58/1999 भादवि 394,34
6 सोनई I 61/1999     भादवि 457,394
7 सोनई I 62/1999 भादवि 457,394
8 सोनई I 68/1999 भादवि 457,395
9 सोनई I 81/1999 भादवि 394,457,34
10 सोनई I 83/1999 भादवि 394,457,34
11 सोनई I 87/2012 भादवि 395,420
12 सोनई I 118/2012 भादवि 395,420
13 सोनई I 178/2013 भादवि 394,420
14 सोनई I 45/2014 भादवि 395,420
15 सोनई I 59/2014 भादवि 395,397,120ब,411,आर्म ॲक्ट 3/25
16 सोनई I 07/2015 भादवि 395,420

दरोडयातील आरोपी जेरबंद

दि. 26/12/2015 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सौरभ त्रिपाठी साो अहमदनगर व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. पोनि सोमवंशी श्रीगोंदा  पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा   पोस्टे चे सपोनि वांगडे व त्यांचे पथकातील पोकॉ वाघ, पोकॉ वाबळे, पोकॉ किरण पवार, पोकॉ दुधाडे, पोकॉ बाहिर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन श्रीगोंदा परिसरात सापळा रचुन आरोपी नामे मुन्ना कावर्या काळे वय- 30 रा. श्रीगोंदा व लहु कावर्या काळे वय 23 रा. सदर आश्या कावर्या काळे वय 20 यांना श्रीगोंदा पोस्टे I गुरनं 307/2015 भादवि कलम 395 मध्ये जेरबंद केले.